नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - कामावरून घरी जाणार्या तरुणास कारमधून आलेल्या टोळक्याने कोयत्याचा वार करून जखमी केल्याची घटना म्हसरूळ येथे घडली.
फिर्यादी साहिल किरण काळे (रा. शिवदर्शन अपार्टमेंट, हरिहरनगर, म्हसरूळ) हा ड्रायव्हर असून, कामावरून मोटारसायकलीने घरी जात होता. वृंदावननगर येथे समोरून कारमधून आलेला आरोपी अनिकेत रमेश बागूल, सौरभ रानडे व त्याचे चार अनोळखी साथीदार यांनी फिर्यादीच्या मोटारसायकलीला कट मारून शिवीगाळ केली, तसेच फिर्यादीच्या पोटाला चॉपर लावून टोळक्याने मारहाण केली, तसेच डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.