नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणार्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी योगेश रामदास शेवाळे (रा. रामलीला लॉन्सच्या बाजूला आडगाव, नाशिक) याने फिर्यादी तरुणीला वेळोवेळी लग्नाचे वचन देऊन व लग्नाचे आमिष दाखवून नाशिकरोड, सामनगाव रोड व इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने लग्नाबाबत विचारले असता तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केली.
हा प्रकार दि. 5 सप्टेंबर 2023 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात योगेश शेवाळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहेत