खळबळजनक ! बलात्कार करून महिलेची हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी...
खळबळजनक ! बलात्कार करून महिलेची हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी...
img
वैष्णवी सांगळे
बंगळुरू शहरातील मीको लेआऊट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक आणि तितकीच खळबळजनक घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे हे दुष्कृत्य केल्यानंतर आरोपीने त्याच ठिकाणी आत्महत्या केलीय. 

प्राथमिक माहितीनुसार, ६५ वर्षीय पीडित मृत महिला ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती त्याच बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर तिची २७ वर्षीय मुलगी राहत होती. रविवारी पहाटे घटना घडली असून घरातील नोकराने हे भयंकर कृत्य केले. आरोपी देवराजू (५० वर्षे) तमिळनाडूच्या होसूर येथे राहत होता. तो गेल्या ८ वर्षांपासून ६५ वर्षीय महिलेच्या घरामध्ये नोकर म्हणून काम करत होता. घरातील सर्व कामं तो करायचा. तो याच बिल्डिंगमधील इतर घरांमध्ये देखील काम करायचा. देवराजूने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. हत्या झालेल्या महिलेच्या मानेवर जखमा आढळून आल्या. गुन्हा केल्यानंतर आरोपीने भीतीपोटी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

ब्रेकिंग न्यूज : राज्यात चाललंय काय ? आणखी एका मंत्र्याच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

हत्या करण्यात आलेल्या महिलेचा नवरा एका प्रसिद्ध कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतो. ही घटना घडली तेव्हा तो कामानिमित्त परदेशात गेला होता. रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास महिलेचा नवरा घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडून जेव्हा तो बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याची बायको जमिनीवर मृतावस्थेत पडलेली दिसून आली. तर नोकर देवराजू पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

हे पाहून महिलेच्या नवऱ्याला धक्का बसला आणि त्याने आरडाओरडा केला. तेव्हा त्याची मुलगी धावत आली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळेल. याप्रकरणी पोलिसांनी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group