पोलिसांनी लाच घेऊन 'त्याला' साथ दिली, २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मन सुन्न करणारं  कारण
पोलिसांनी लाच घेऊन 'त्याला' साथ दिली, २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मन सुन्न करणारं कारण
img
वैष्णवी सांगळे
छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारीपणातून एका २६ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदेश दिनकर गवळी असे मृत तरुणाचे नाव आहे. चोरीला गेलेला ट्रक पोलिसांना सापडला नाही. मात्र, त्यानंतरही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने आर्थिक संकटात अडकल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. मृत्यूआधी त्याने हातात औषधाची बॉटल घेऊन सेल्फी काढली अन् सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले. 

संदेश टँकरचा व्यवसाय करत होता. आई, वडील, दोन भाऊ, बहिणीसह तो जय भवानीनगरमध्ये राहत होता. गुरुवारी सायंकाळी कुटुंब एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्याने सुसाईड नोट लिहून, विषारी औषधसोबत हसरे सेल्फी काढले. तसेच हेच फोटो मित्रांना व्हाट्सएपवर पाठवून विष घेत जीवनयात्रा संपवली. चिठ्ठीमध्ये त्याने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. 

आत्महत्येपूर्वी संदेशने एक सुसाइड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. संदेशने आपल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी माझा ट्रक चोरणाऱ्या माणसाला मदत केली, असे संदेशने शेवटच्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार का, याबाबत शंका उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासन काही विशेष पावले उचलणार का, हे बघावे लागेल. 

पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप 
मी संदेश दिनकर गवळी आज दिनांक 2.4.2026 रोजी माझी जीवनयात्रा समाप्त करत आहे. त्यासाठी चिकलठाणा पोलीस प्रशासन जबाबदार आहे. ज्याने माझा ट्रक चोरला त्याच्याकडून लाच घेऊन पोलिसांनी त्याला साथ दिली. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणी जबाबदार नसून सामान्य लोकांच्या सेवेसाठी नेमलेले पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. माझा एमएच 46 पी 2797 हा ट्रक 6 ऑक्टोबर 2024 रोजी चोरीला गेला होता. या ट्रकवर कोटक बँकेचे लोन असून इन्शुरन्स नसल्याने ते पैसे मला भरावे लागत आहेत. या अपयशाचा शिक्का माझ्या माथी बसल्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, कोणालाही त्रास देऊ नये. माझ्या शेवटच्या क्षणी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. माझे कोटक बँकेचे गाडीसोबत आलेला इन्शुरन्स आहे, त्याची मदत घ्यावी. तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर.


इतर बातम्या
Join Whatsapp Group