पती-मुलाचं निधन, दुसरा विवाह अन... आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाइंड समोर
पती-मुलाचं निधन, दुसरा विवाह अन... आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाइंड समोर
img
वैष्णवी सांगळे
आपल्या नातीला संभाळणारी ७० वर्षीय वृद्ध महिला आपल्या आणि पत्नीच्या नात्यात अडथळा ठरत असल्याच्या संशयावरून सावत्र आजोबाने आपल्या नातीला संभाळणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेसह सहा वर्षीय नातीचा निर्घृण खून केल्याची घटना आळंदी परिसरातील ठाकरवस्ती, केळगाव येथे गुरुवारी (दोन एप्रिल) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी असणाऱ्या सावत्र आजोबाला आळेफाटा (ता. जुन्नर) येथून अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी संगीता दत्तात्रय केदारी (वय ४१) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनायक तुकाराम भवारी (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती.

रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला.
 
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता. या वादाचा शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाला. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणाचा पोलीस तपास करताना समोर आले की, आरोपी आणि फिर्यादी संगीता केदारी यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख होऊन नंतर विवाह झाला होता. मात्र, अलीकडील काळात त्यांच्यातील नात्यात तणाव वाढला होता. घरात येण्यास विरोध, तसेच नातेसंबंध तोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा संशय आरोपीला होता. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे

 घटनेच्या रात्री संगीता केदारी कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने घरात प्रवेश करून झोपेत असलेल्या चिमुरडीचा गळा आवळला, तर वृद्धेवर प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आळंदी पोलीस आणि क्राईम ब्रँचने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला अटक केली आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group