पत्नीच्या चारित्र्यावर संशय,  बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली... क्रूरतेचे कळस गाठले
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली... क्रूरतेचे कळस गाठले
img
वैष्णवी सांगळे
कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नीची अमानुषपणे हालहाल करून हत्या केल्याची घटना घडली आहे. देवदर्शनासाठी जात असताना पतीने पत्नीला कारमधून ओढून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?
पती पत्नी मध्ये संशयाची सुई निर्माण झाली की अघटित होऊन बसत, कर्नाटक मध्ये घडलेल्या घटनेनं पुन्हा एकदा हेच दिसून आलं आहे. बारामती येथील दाम्पत्य दर्शनासाठी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात गेले होते. प्रवासादरम्यान बल्लुरगी गावाजवळ पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने रागाच्या भरात पत्नीला धावत्या कारमधून खाली ओढले आणि रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. क्रूरतेचा सीमा त्याने ओलांडत त्याने थेट तिल अंगावरती गाडी घालून चिरडलं.



घटना पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. संपूर्ण प्रकार काही स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. काही वेळ नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. नागरिक तिथे असेपर्यंत आरोपी शांत असल्याचे भासवत होता, मात्र नागरिक बाजूला होताच त्याने क्रूरतेचा कळस गाठला. मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या पत्नीवर आरोपी पतीने थेट कार चढवली. अत्यंत अमानुषपणे कार खाली चिरडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन या २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. ही घटना पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group