बहिणीची छेड काढल्याने भावाचा संताप अनावर, संतापलेल्या भावानं गोळ्या झाडल्या; एकाच मृत्यू
बहिणीची छेड काढल्याने भावाचा संताप अनावर, संतापलेल्या भावानं गोळ्या झाडल्या; एकाच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (2 एप्रिल) सकाळी साधारण 11.30 वाजेच्या सुमारास कैलास नगर परिसरात गोळीबाराची  घटना घडली आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, जयन शिवानंदन नायर (वय वर्ष 51) याने त्याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबाराच्या घटनेत तिघे गंभीर जखमी  झाले असून या तिघांना जखमी अवस्थेत काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून तो सध्या वायरल होत आहेत. आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group