नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर !
नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर !
img
वैष्णवी सांगळे
'कैसे हराया' म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या आणि विधानामुळे मोठ्या प्रसिद्धीस आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख सध्या 'बनावट जात प्रमाणपत्रा'मुळे कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. सहर शेख सध्या ठाणे महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेविका आहेत. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या होत्या. 



दरम्यान बनावट जात प्रमाणपत्रा'मुळे त्या अडचणीत आल्या आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ असलेल्या नगरसेविका सहर शेख  वानखेडे स्टेडियमवर दिसल्या. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. मुंबई आणि पंजाबचा हा सामना पाहण्यासाठी सहर शेख वानखेडे मैदानात उपस्थित होत्या. सहर शेख यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासोबत व्हिडीओ पोस्ट करताना गेम ओव्हर...असंही सहर शेख यांनी लिहिलं आहे. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ..जाने तू कैसी होगी..असं गाणंही सहर शेख यांनी व्हिडीओसोबत पोस्ट केलंय. सहर शेख यांनी तेरे जाने से क्या क्या हुआ...या गाण्याने सहर शेख यांनी सगळ्यांना पुन्हा डिवचल्याचे बोलले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group