अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होणारच... शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला थेट इशारा, फाटाफूट कराल तर...
अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होणारच... शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला थेट इशारा, फाटाफूट कराल तर...
img
वैष्णवी सांगळे
पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे गटाने तीव्र नाराज व्यक्त केली आहे. शिंदे गटातील काही नेत्यांनी ही नाराजी बोलून देखील दाखवली आहे.  दरम्यान पुन्हा ३ नोव्हेंबरला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

ठाणे जिल्ह्यातील फोडाफोडीवरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच शिंदेंच्या निकटवर्तींयांनाच भाजपात घेतल्याने महायुतीमधील हा वाद आता आणखी वाढू शकतो. कारण , डोंबिवलीतील दोन बडे नेते भाजपाच्या गळाला लावण्यात रवींद्र चव्हाण यांना यश मिळाले आहे. सदानंद थरवळांचा मुलगा अभिजीत थरवळ तसेच कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. 

रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंचे विश्वासू शिलेदार फोडताच मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत इशाराही दिला आहे. रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. मग अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होणारच...रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली-कल्याण कशाला बघता. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल, असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले. 

तसेच अशापद्धतीने फाटाफूट झाली तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा देखील मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group