केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. उभय नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं होतं.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिली होती. त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेचे उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे लोकसभेचे रिंगणात असतील की नाही? याची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.