महत्वाची बातमी : महाराष्ट्राची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय ;
महत्वाची बातमी : महाराष्ट्राची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय ; "ही" माहीती आली समोर
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवला आहे. त्यात भाजपला सर्वाधिक स्ट्रॉईक रेट आणि जागाही मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप नेते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहे.

महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाचे नायक देवेंद्र फडणवीस असून त्यांच्याच हाती महाराष्ट्राचे सूत्र सोपवण्याचा निर्णय भाजपमध्ये जवळपास निश्चित झाला आहे. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीत याबद्दलची चर्चा झाली असून या विजयाच्या भव्यतेला साजेसा समारंभात शपथविधी सोहळा करण्याचे ठरत असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विजय मिळाला ही भाजपला पूर्णता समजत असून त्यांच्याही या कर्तृत्वाचा मान राखला जाईल असे या नेत्याने सांगितले. महाराष्ट्राला विजय हा आर्थिक राजधानीतला असून भारताला महासत्ता करायचे असेल तर मुंबईतूनच तो मार्ग जात असल्याचे लक्षात घेत यावेळी फडणवीस यांच्यावरच राज्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. 

येत्या दोन-तीन दिवसांत शपथविधीची तयारी केली जाईल असे समजते, एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात 90% चा स्ट्राइक रेट गाठणे ही एक कौतुकास्पद कामगिरी असून या सोहळ्याला भव्य स्वरूप देण्याचा भाजपाचा मनोदय आहे. राज्यातील आमदार , कार्यकर्ते ,संत समूह, उद्योगपती ,सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी विविध देशांचे वाणिज्य दूत , लेखक कलावंत यांना या शपथविधी समारंभाचे आमंत्रण दिले जाणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group