फॉर्म्युला ठरला ! 'ठाण्याला ५ वर्षात ४ महापौर आणि ४ उपमहापौर मिळणार; 'ही' महिला नेता संभाळणार महापालिकेची धुरा
फॉर्म्युला ठरला ! 'ठाण्याला ५ वर्षात ४ महापौर आणि ४ उपमहापौर मिळणार; 'ही' महिला नेता संभाळणार महापालिकेची धुरा
img
वैष्णवी सांगळे
ठाणे महाालिकेसाठी महापौर आणि उपमहापौरपदासाठी नवा फॉर्म्युला ठरला आहे. सव्वा वर्ष महापौरपद आणि उपमहापौरपद असणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात ठाणेकरांना चार महापौर आणि चार उपमहापौर मिळणार आहे. महापौरपदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत, त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी महापौरपदासाठी नवा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये अखेर महापौरपद शिंदेनी कायम ठेवले आहे. तर दोनवर्षासाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौर पदी अर्ज दाखल केला आहे. शिंदेसेनेच्या महापौरपदी कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देश पत्र दाखल केले आहे. 

भाजपकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देश दाखल केले आहे. विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येणाऱ्या 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.महापौरपदासाठी आग्रही असणाऱ्या भाजपने उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देश पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड निश्चित झाली आहे. 

महापौर आणि उपमहापौरपदाचा फॉर्म्युला पहिले सव्वा वर्षे महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षाने शिंदेसेनेचा महापौर बसणार आहे. तसेच भाजपकडून देखील उपमहापौर पद हे सव्वा वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा वर्षाने उपमहापौरपदाचा चेहरा देखील बदलला जाणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group