एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. त्यात पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या युतीच्या ऑफरने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आता उद्धव ठाकरे यांनी सामना मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य केले आहे.
शिवसेना उबाठा गटाचे मुखपत्र सामना वर्तमान पत्राला उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि मोदी-शाह यांच्यावर टीका केली. विधानसभेला वाढलेल्या मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह देखील यावेळी त्यांनी उपस्थित केले. यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावणारे वक्तव्य केले. एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना भाजपात विलिन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कुणी कितीही ठाकरे ब्रँड संपवण्याा प्रयत्न केला तर तो संपणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केला आहे.
त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले. निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’ आहे. त्या धोंड्याला शेंदूर फासला तरी ‘शिवसेना’ हे नाव व धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्याला देण्याचा अधिकार या धोंड्याला नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ‘