कोणतीही तडजोड होणार नाही, मुंबईत महापौर भाजपचाच, शिंदेंना स्पष्ट सांगा; दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचे फडणवीसांना आदेश , पण...
कोणतीही तडजोड होणार नाही, मुंबईत महापौर भाजपचाच, शिंदेंना स्पष्ट सांगा; दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचे फडणवीसांना आदेश , पण...
img
वैष्णवी सांगळे
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये  भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या आहेत.  शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या आहेत. दोघांच्या मिळून ११८ जागा होत असून आता महापौरपदावरून चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये आता महापौरपदावरून जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. त्यात दुसरीकडे 'देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर ठाकरे गटाचाच होणार' असल्याचे उद्धव ठाकरे म्हणत आहे. त्यामुळे मुंबईत महापौर कोणाचा याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

दरम्यान मुंबईचं महापौर पद हे आपल्याकडेच आलं पाहिजे, त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही असं भाजपने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबईचं महापौर पद मिळवण्यावर भारतीय जनता पक्ष ठाम असून त्यात कोणतीच तडजोड करण्यात येणार नाही. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत अशीही चर्चा आहे.  मात्र असं करतानाचा मित्रपक्षांशी कोणताही कडवटपणा येऊ देऊ नका, कटुता टाळा असा सल्लाही देण्यात आला आहे.

बऱ्याच वर्षांनी भाजपला मुंबई महानगरापालिकेवर आपला झेंडा फडकावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे महापौर पद आपल्याकडेच यायला हवं, अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. त्यामुळेच मुंबईचं महापौरपद आपल्याकडेच राहावे, यावर भाजप ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणं आहे. मुंबई व अन्य महापालिकेत महायुतीत सन्मान जनक तोडगा काढा असे निर्देश दिल्लीतील नेतृत्वाने दिले आहेत. एवढंच नव्हे तर ठाण्याच्या महापौरपदासाठीही भाजपने दोन वर्षांचा दावा कायम ठेवला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group