मुंबई हायकोर्ट आक्रमक ! हवा प्रदुषणावरून महापालिका आयुक्तांवर ओढले ताशेरे, पालिका आयुक्तांचा पगारही थांबवला
मुंबई हायकोर्ट आक्रमक ! हवा प्रदुषणावरून महापालिका आयुक्तांवर ओढले ताशेरे, पालिका आयुक्तांचा पगारही थांबवला
img
वैष्णवी सांगळे
दिल्लीसह महाराष्ट्रात देखील हवाप्रदूषण ही दिवसेंदिवस मोठी समस्या बनत चालली आहे.यामुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.  हवाप्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने आक्रमक होत मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्तांचा पगार थांबवण्यासह कोर्टाने त्यांना कामात निष्काळजीपणा का केला जात आहे, याबाबत चौकशी करण्याचा इशारा दिला आहे. 

हवाप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असलयाचे लक्षात घेऊन कोर्टाने आयुक्तांकडे तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने ३ तासांच्या आत हवामानाची, प्रदूषणाची व हवेच्या गुणवत्तेची सविस्तर आकडेवारी सादर करण्यास महापालिकांना आदेश दिले आहे.

यासोबतच, कोर्टाने महापालिकांना नियमित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जर निर्देश पाळले नाहीत, तर पुढील कायदेशीर कारवाई होईल, अशी स्पष्ट सूचना देखील न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील प्रशासनिक कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group