मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा, पोस्टरमुळे खळबळ; 'या' ठिकाणच्या ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा, पोस्टरमुळे खळबळ; 'या' ठिकाणच्या ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
img
वैष्णवी सांगळे
मतदानाचा हक्क जास्तीस्त जास्त लोकांनी बजावावा यासाठी जाहिरातबाजी , फलकबाजी करण्यात येत आहे. त्यासोबतच मतदारांना मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी १५ जानेवारीला म्हणजेच मनपा निवडणुकीच्या पार्शवभीमीवर एक दिवस भरपगारी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र जुहू परिसरातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

 गेल्या ३५ वर्षापासून इथल्या २०० धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडल्या आहेत. इमारतींचे पुनर्विकास होऊ शकत नसल्याने जवळपास ३५ हजार लोक या धोकादायक इमारतींमध्ये भीतीच्या सावटाखाली राहतात असा दावा करण्यात आला आहे. या परिसरातील 200 इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिक आणि दोन झोपडपट्ट्यांमधील लोकांनी त्यांच्या समस्या या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. अनेकदा त्याचा पाठपुरवठा करूनही त्यांना यश आलं नाही. त्यामुळे स्थानिकांनी बॅनरबाजी करत थेट मतदानावर बहिष्कार टाकल्याचं म्हटलं आहे. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे अनेक बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लागल्याचं दिसतंय. 

बॅनरवरती नेमकं काय ?
SR0150 कायदा कालबाह्य आहे आणि त्यामुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत. 1939 च्या ब्रिटिश कायद्याअंतर्गत (1976 मध्ये अंमलात आणलेला) आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आले आहे. सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून इथल्या 35,000 नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा. यापुढे खोटी आश्वासने आता चालणार नाहीत.

लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी त्यांच्या प्रश्नावर निवडणुकीनंतर तोडगा काढणार असं आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर कोणताही नेता मदत करत नसल्याचं सांगत रहिवाशांनी पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.

mumbai | juhu |
इतर बातम्या
Join Whatsapp Group