दैनिक भ्रमर : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागांत पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेले आहे. दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
हे ही वाचा...
रायगडच्या समुद्रामध्ये बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या करंजा गावानजीकच्या समुद्र किनाऱ्याजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती नौदलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या बोटीला अपघात कसा झाला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. बोट बुडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. समुद्रात बुडालेल्या या बोटीत एकूण सात खलाशी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
हे ही वाचा...
या खुलाशांना वाचवण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला गेला. ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ जवान आणि नौदालाच्या गस्त नौकांद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.मात्र बोटीला हा अपघात कशामुळे झाला? किती नुकसान झाले? याबाबत काहीच माहिती मिळाली नाही.
महत्वाचे म्हणजे, वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात आली कशी? ही गुजरातची बोट इथपर्यंत आली कशी? नक्की प्रकार काय आहे? याचा तपास नौदलाकडून केला जात आहे. दरम्यान, ही बोट बुडत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बोटीमध्ये पाणी शिरले त्यानंतर संपूर्ण बोट समुद्रात बुडू लागली. बोट बुडत असल्यामुळे त्यावर असलेल्या सर्व खलाशांनी समुद्रामध्ये उडी मारली. हे खलाशी समुद्रामध्ये पोहत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.