मुंबईत ११ जुलै २००६ हल्ल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. मुंबईला हादरवून सोडणाऱ्या साखळी बॉम्बस्फोट हल्लयात १८९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ८०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने ५ जणांना फाशीची शिक्षा तर ७ जणांना जन्मठेप सुनावली होती. ती शिक्षा आता उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. न्यायमूर्ती श्याम चांडक आणि अनिल किलोर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.