मुंबईमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरूवारी दुपारी एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणी व्हीबी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरूवारी दुपारी कुर्ला पश्चिममधील एचडीआयएल कंपाऊंडमधील (HDIL Compound, Kurla West) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारण म्हणजेच एसआरए प्रकल्पाच्या इमारत क्रमांक ९ मध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा व्यक्ती बीएमसीमध्ये कार्यरत होता. पोलिसांकडून या प्रकऱणाची सखोल चौकशी सुरुआहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या सरकारी रूग्णालयात पोस्ट मार्टमसाठी पाठवलाय.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षी मृत व्यक्तीचे नाव राजेश परमार असे आहे. राजेश परमार हा घाटकोपरमधील रहिवासी आहे. राजेश हा बीएमसी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट (एसडब्ल्यूएम) विभागात एफ नॉर्थ वॉर्डमध्ये काम करत होता.
राजेश याचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली आहे. आजूबाजूच्या ठिकाणी चौकशी केली जातेय. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहे. एसडब्ल्यूएम विभागातील सहकारी कर्मचाऱ्यांचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे. राजेश यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा पुढील तपास सध्या सुरू आहे.