टॅक्सीचालकाला मनमानी भोवली ! पोलिसांनी टॅक्सी जप्त करत चालकालाही अटक केली, नेमकं प्रकरण काय ?
टॅक्सीचालकाला मनमानी भोवली ! पोलिसांनी टॅक्सी जप्त करत चालकालाही अटक केली, नेमकं प्रकरण काय ?
img
वैष्णवी सांगळे
मुंबईकरांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक पर्यटनासाठी किंवा कामाच्या शोधात मुंबईला येतात. मुंबई म्हटलं की गर्दी आलीच. त्यामुळे प्रवासासाठी अनेक जण बस, टॅक्सी, रेल्वेचा वापर करतात. नवीन शहर असल्यामुळे अनेकांना प्रवासाचे भाडे सर्वसाधारण किती असते याचा अंदाज नसतो आणि त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होते. बऱ्याचदा ही आर्थिक फसवणूक टॅक्सीचालकांकडून होत असते. मात्र फसवणूक एका टॅक्सीचालकाला चांगलीच भोवली आहे. 

 मुंबईत बहुतांश ठिकाणी टॅक्सी चालकांची दादागिरी पाहायला मिळते, अनेकदा मीटर बंद ठेऊनच प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडण्यात येते. याबाबत परिवहन विभागाने कारवाईचे निर्देश दिले असतानाही टॅक्सी चालकांची ही मुजोरी मुंबईत ठिकठिकाणी पाहायला मिळते. नुकतेच, दादरमध्ये काही टॅक्सी चालकांच्या मनमानीचा कारभार उघडकीस आला आहे. 

अवघ्या काही किलोमीटर प्रवासासाठी प्रवाशांकडून तब्बल 2 हजार रुपये भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत यासंदर्भाने पोलिसांत धाव घेतली. दादर ईस्ट परिसरात काही ठराविक टॅक्सी चालकाकडून असे प्रकार वारंवार घडत असल्याची नोंदही पोलिसांकडे आहे. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने वारंवार टॅक्सी चालकांकडून असे प्रकार घडत आहेत.  आता, प्रवाशांकडून जास्त पैसे आकारल्याने माटुंगा पोलिसांनी टॅक्सी चालकांच्या मुसक्या आवळत 4 टॅक्सी जप्त केल्या आहेत.  यात दोन टॅक्सी चालकांसह 7 जणांना अटक करण्यात आलीय.

मुंबईतील माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत 24 ते 26 जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन पूर्व या ठिकाणी दोन टॅक्सीचालक आणि त्यांच्या साथीदाराने दोन प्रवाशांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील टॅक्सीचालकाने प्रवाशांना अनुक्रमे 1800 रुपये आणि 2000 रुपयांची फसवणूक केल्याने सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून एकूण 07 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यातील फसवणुक केलेली मालमत्ता तसेच 04 टॅक्सी जप्त करण्यात आल्या आहेत. 
mumbai |
इतर बातम्या
Join Whatsapp Group