धक्कादायक ! वडिलांनी दारू सोडण्यासाठी सांगितलं, मुलाने टोकाचं पाऊल उचललं ; थेट...
धक्कादायक ! वडिलांनी दारू सोडण्यासाठी सांगितलं, मुलाने टोकाचं पाऊल उचललं ; थेट...
img
वैष्णवी सांगळे
वडिलांनी दारूचे व्यसन सोडण्यासाठी सल्ला दिल्याने मुलाने थेट तो राहत असलेल्या अपार्टमेंटच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारली. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी मुंबईतील वडाळा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव हैदर कराचीवाला आहे. हैदरला दारूचे व्यसन होते, ज्यामुळे त्याच्या घरी वारंवार वाद होत होते. शनिवारी सकाळी हैदरचा त्याच्या कुटुंबियांशी वाद झाला. त्यानंतर तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचे वडील युसूफ कराचीवाला यांना पहाटे ४ वाजताच्या सुमारास विलेपार्ले पोलिस ठाण्यातून फोन आला.

पोलिसांनी सांगितले की त्यांचा मुलगा दारूच्या नशेत सापडला आहे आणि त्याला घरी घेऊन जावे. वडील रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याला घरी घेऊन आले. घरी परतल्यानंतर, हैदरच्या पालकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दारू सोडण्याचा सल्ला दिला.या वादविवादानंतर हैदर त्याच्या खोलीत गेला. 

बराच वेळ हैदर खोलीबाहेर न पडल्याने त्याच्या वडिलांनी त्याला हाक मारली. मात्र हैदरने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हैदरच्या वडिलांना शंका आली. त्यामुळे ते हैदरच्या खोलीत गेले. दरम्यान सकाळी ८:१५ च्या सुमारास, हैदरच्या वडिलांना तो त्याच्या खोलीतून पडल्याचे आढळले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत पाचारण केले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group