केसरकारांसोबत फोटो , एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारणारा रोहित आर्य ज्या योजनेमुळे संपला, ती सरकारी योजना नक्की काय होती ?
केसरकारांसोबत फोटो , एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारणारा रोहित आर्य ज्या योजनेमुळे संपला, ती सरकारी योजना नक्की काय होती ?
img
वैष्णवी सांगळे
गुरुवारी मुंबईत घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडली. मुंबईच्या पवई परिसरात रोहित आर्य या व्यक्तीने १७ जणांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. रोहित आर्य याने १७ मुलांना सरकारी जाहिरातीसाठी ऑडिशनच्या नावाखाली पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये बोलावले होते आणि त्यांना ओलीस ठेवले होते.



 मुलांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु झाले. यावेळी मुलांना वाचवताना पोलिसांनी रोहित आर्य वर गोळी झाडली ज्यात तो जखमी झाला आणि त्याचा नंतर मृत्यू झाला. पोलिसांनी केलेला एन्काउंटर योग्य की अयोग्य यावर भिन्न मतप्रवाह दिसून येत आहे. 



मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा मृत्यू गरजेचं होता असे अनेकांकडून सांगण्यात येत असताना रोहित आर्य या सुशिक्षित तरुणाने इतका टोकाचा निर्णय का घेतला , त्याला काय बोलायचं होतं हे सांगताना अनेकांनी त्याचा एनकौंटर हा चुकीचा निर्णय असल्याचे सांगितले आहे.  रोहितचा एन्काउंटर करून काही बड्या लोकांचे पुरावे संपवायचे होते का हा प्रश्न दबक्या आवाजात अनेकांकडून विचारला जात आहे. 

रोहित आर्य याने वर्षभरापूर्वी शिंदे सरकारच्या काळात एका सरकारी योजनेचे काम केले होते. मात्र, या योजनेचे तब्बल 2 कोटी रुपयांचे देणे सरकारने थकवले होते. याविरोधात रोहित आर्य याने उपोषणही केले होते. मात्र, त्याला सरकारी यंत्रणने दाद न मिळाल्यामुळे रोहित आर्य प्रचंड नैराश्यात होता. याच नैराश्याच्या भरात रोहित आर्य याने १७ जणांना ओलीस ठेवले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी २० ऑगस्टला पत्रकार भवनातून बाहेर पडत असताना सामाजिक कार्यकर्त्यास एक व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध पडलेली  दिसली. त्या व्यक्तीचा विचारपूस केली तेव्हा त्याने राज्य सरकारशी केलेला पत्रव्यवहार त्यांना दाखवला. त्यावेळी आम्हाला समजले की, हा माणूस १६ ते १७ दिवस आमरण उपोषण करत होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो तेव्हा कुटुंबीयांनी रोहित आर्य यांचे पैसे राज्य सरकारने थकवल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना' राबवण्यात आली होती. याच योजनेतंर्गत रोहित आर्य यांनी 'स्वच्छता मॉनिटर' हा उपक्रम राबवला होता. 

त्यासाठी रोहित आर्य यांनी स्वत:चे घर आणि दागिने विकले होते. पण 'स्वच्छता मॉनिटर' उपक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांना कुठलेच पैसे दिले नाहीत. त्यामुळे रोहित आर्य यांनी दीपक केसरकर यांच्याविरोधात दोनवेळा उपोषणही केले होते. मात्र, त्यांच्याकडूनही केवळ आश्वासन मिळाल्याने रोहित आर्य प्रचंड नैराश्यात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरज लोखंडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीस सांगितले. रोहित आर्य यांना एक मुलगा आहे. त्यांची पत्नी आयसीआयसीआय बँकेत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. 
mumbai |
इतर बातम्या
Join Whatsapp Group