१४ वर्षांच्या लेकीवर निर्दयी पित्याने ब्लेडने वार केला, कारण...
१४ वर्षांच्या लेकीवर निर्दयी पित्याने ब्लेडने वार केला, कारण...
img
वैष्णवी सांगळे
संशयाचं भूत मनात शिरलं की एखाद्याचं आयुष्य उद्धवस्त व्हायला किंवा करायला वेळ लागत नाही. बायकोवर चारित्र्याचा संशय घेऊन एका इसमाने रागाच्या  भरात लेकीवरच हल्ला केला. १४ वर्षीय लेकीवर वडिलांनी ती झोपेत असताना ब्लेडने गळा चिरण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना सोमवारी उशिरा रात्री दहिसरमधील कोकणी पाडा येथे घडली 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर हल्ला करणारा हनुमंत सोनवळ याला दारूचे व्यसन असून तो पत्नी राजश्री हिच्या चरित्र्यावरती संशय घेऊन तिला मारहाण करायचा . त्यामुळे तिने याबाबत वांद्रे कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केलेली आहे. राजश्री ही नालासोपाऱ्यातील वकिलांकडे घटस्फोटाच्या केसची माहिती घेऊन घरी आल्यानंतर हनुमंतने इतका वेळ कुठे गेली होतीस, असे विचारत तिला त्रास दिला तसेच पत्नी आणि मुलीला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला.

मुलगी रात्री झोपेत असताना रात्री सव्वादोनच्या सुमारास तिच्या गळ्याजवळ काहीतरी चावल्यासारखे वाटून तिला वेदना झाल्या. त्यावेळी तिला वडिलांनी आपला गळा चिरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरड केला असता तिला वाचविण्यासाठी आलेल्या राजश्रीच्या पोटावर ब्लेडने वार केला. या घटनेनंतर नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली, तर जखमी-मायलेकीना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींवरती हल्ला करणाऱ्या हनुमंतला अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group