नाशिकमध्ये हत्येची एक घटना घडली आहे. रवी संजय उशिले (वय २३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत रवी उशिले आणि संशयित ओम गवळी व संतोष गवळी यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
काल रात्री 11:30च्या सुमारास फिर्यादी समाधान गोऱ्हे हे जेवणानंतर घराबाहेर वॉकिंग करत असताना त्यांच्या ओळखीच्या रवी उशिले यांच्याशी गप्पा मारत होते. त्याच गल्लीत राहणारे ओम गवळी आणि संतोष गवळी दोघे तेथे आले.
ओम ने चॉपरने आणि संतोषने लाकडी दांड्याने रवीच्या पोटावर, डोक्यावर मारहाण करून जीवे ठार मारले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह सह.पोलीस आयुक्त शेखर देशमुख, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवत गुप्त बातमीदारार्फत मिळालेल्या माहितीनुसार विल्होळी येथील सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागे लपून बसलेल्या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. दोघांविरूद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.
दोघा आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.