नाशिक : लॉजवर बंद खोलीत आढळला बडतर्फ पोलिसाचा मृतदेह , गूढ मृत्यूने खळबळ
नाशिक : लॉजवर बंद खोलीत आढळला बडतर्फ पोलिसाचा मृतदेह , गूढ मृत्यूने खळबळ
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सराईत गुन्हेगारांसह अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेले इरफान मन्सूर शेख (वय ३५, रा. वडाळागाव) त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमधील खोलीत शनिवारी (दि. ३१) रात्री उशिरा इरफानचा मृतदेह आढळला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला आणि रविवारी १ फेब्रुवारी रोजी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यावेळी इरफानच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने 'व्हिसेरा' राखून ठेवण्यात आला.

इरफानने आत्महत्या केली, की नशेच्या 'ओव्हर डोस' मुळे त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला यासंदर्भातील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर 'व्हिसेरा' राखून ठेवण्यात आला आहे. अतिनशेत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणात अकस्मीत मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. 

इरफान यांच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे. त्यांचे वडील नाशिक पोलिस दलातून निवृत्त झालेले असून, त्यांचे सख्खे व चुलतभाऊ शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. दरम्यान हा मृत्यू नशेच्या ओव्हर डोसमुळे, हृदयविकाराने झाला की त्यांची हत्या करण्यात आली हे गूढ अद्यापही कायम आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group