नाशिकमध्ये चाललंय काय ? वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण
नाशिकमध्ये चाललंय काय ? वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - वॉरंटबाबत माहिती देऊन पोलीस स्टेशनला चला, असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार मखमलाबाद बस स्टॅण्ड येथे घडला.

याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ गुंबाडे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सहकारी पोलीस हवालदार एस. टी. खैरे यांच्यासोबत आरोपी राजेंद्र त्र्यंबक भामरे (रा. मखमलाबाद) यास न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत उद्घोषणा वॉरंट बजावण्यासाठी गेले होते. आपले कामकाज आटोपून पोलीस ठाण्याकडे येत असताना मखमलाबाद बस स्टॅण्ड येथे समरी केसमधील प्राप्त वॉरंटमधील आरोपी सुभाष दत्तात्रय राजोळे (रा. मखमलाबाद) हा बस स्टॅण्डकडून पळून जाऊन रिक्षामध्ये बसताना दिसला. 

फिर्यादी व सहकारी यांनी त्याच्याजवळ जाऊन वॉरंटबाबत माहिती दिली, तसेच “आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला,” असे सांगितले. त्यावेळी राजोळे याने पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच परत आल्यानंतर तुमच्याकडे बघून घेईन, अशी दमदाटी केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात सुभाष राजोळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group