मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून आई-वडील गावी निघाले; मध्येच पोलिसांनी अडवलं अन...
मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून आई-वडील गावी निघाले; मध्येच पोलिसांनी अडवलं अन...
img
वैष्णवी सांगळे
२० वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत होते. पण एका नागरिकाच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना यात यश आले नाही. पोलिसांनी नराधम आई-बापाला ताब्यात घेतले आहे. 

नेमकं काय घडलं ? 
घरातील साहित्य गावी न्यायचं आहे म्हणत वडगाव कोल्हाटी पासून तिसगाव चौफुलीपर्यंत साबळे कुटुंबाने रिक्षा भाड्याने केली. रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याच दिसलं. सामान भरताना त्याला संशय आला, त्यानंतर त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच ११२ ला फोन करून सांगितले की, त्या गादीमध्ये काहीतरी संशयास्पद गुंडाळून ठेवलेले आहे,. 

गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये २० वर्षीय नंदणी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित तरुणीच्या सावत्र आई-वडिलांनी, “मुलीने गळफास घेतला असून तिचा मृतदेह गावाकडे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होतो,” अशी माहिती दिली. 

मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनासाठी ठेवला आहे. मुलीचे अफेअर होते. त्यामुळे तिने गळफास घेतला. आम्ही गावी घेऊन निघालो होतो, असे आईचे म्हणणे आहे.दरम्यान, पुढील तपासासाठी सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group