मोठी बातमी!  नाशिकमध्ये भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब
img
वैष्णवी सांगळे
महापालिका निवडणुकीत भाजपाला नाशिकमध्ये मोठे यश मिळाले. नाशिक महानगरपालिकेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता नाशिककरांना महापौर, उपमहापौर कोण मिळणार ? याची नाशिककरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच नाशिकरांची ही उत्सुकता संपणार आहे.नाशिक महापालिकेची महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.६) पार पडणार आहे. 

भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार असल्याचे जवळपास निश्चित होते. याच पार्श्वभूमीवर आज मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर, उपमहापौर पदाचे नाव निश्चित करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचे नाव ठरविण्यात आले आहे.

ब्रेकिंग न्यूज : राज्यात चाललंय काय ? आणखी एका मंत्र्याच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

भाजपकडून महापौरपदासाठी आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आणि प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित झाले आहे.तर उपमहापौरपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिद्र सानप यांचे नाव निश्चित झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा काही वेळातच मंत्री गिरीश महाजन करणार असल्याची माहिती मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group