सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा... पत्रकार परिषदेपूर्वीच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड
सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा... पत्रकार परिषदेपूर्वीच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड
img
वैष्णवी सांगळे
एक मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.  निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असतानाच याठिकाणी गोंधळ उडालाय . पत्रकार परिषदेपूर्वीच मनसैनिकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडले. मतदार यादी संदर्भात घोळप्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे.

मतदार यादी संदर्भात घोळ असल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले असताना, निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता. \ संपूर्ण मतदार संघामधील मतदार याद्या हाताळण्याकरिता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने मनसे कार्यकर्ते यावेळी प्रचंड संतापले. 

तसेच यावेळी अधिकाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने संतप्त मनसैनिकांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयामधील संगणक फोडले आहेत.
सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मनसे स्टाईल दणका देऊ, मतदार संघातील याद्या अपडेट केल्या नाहीत तर पुन्हा  आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. 
mumbai |
इतर बातम्या
Join Whatsapp Group