भयावह ! १२ वर्षीय चिमुकलीवर २०० पेक्षा अधिक नराधमांकडून लैंगिक अत्याचार
भयावह ! १२ वर्षीय चिमुकलीवर २०० पेक्षा अधिक नराधमांकडून लैंगिक अत्याचार
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर - मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.  आता पुन्हा एकदा मुंबई परिसरातून संतापजनक प्रकार समोर आला आहे.  नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. 

कबुतरखान्याचा मुद्दे पेटणार ? जैन समुदायाला आता मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार

१२ वर्षीय चिमुकली मुळची बांगलादेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ही चिमुकली शाळकरी विद्यार्थी आहे. एका विषयात ती नापास झाली होती. आई वडील मारतील किंवा ओरडतील या भीतीपोटी तिनं घर सोडलं. बांगलादेशहून भारतात आली. काही लोकांना मुलगी एकटी दिसली आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेतला. 

तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी बलात्कार केल्याची बाब तिने उघडकीस आणली. २६ जुलै रोजी मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी धाड टाकत अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच या रॅकेटच्या संबंधित १० जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, त्या २०० पुरूषांनाही अटक करण्याची मागणी आता केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group