नाशिक : नराधम बापाच्या अत्याचारात अल्पवयीन मुलगी गरोदर
नाशिक : नराधम बापाच्या अत्याचारात अल्पवयीन मुलगी गरोदर
img
वैष्णवी सांगळे
नाशिक : नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नराधम बापानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचारात मुलगी गरोदर राहिली आहे. या प्रकरणी तिच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोध फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यातील पिडीत मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला तिच्या आईने उपचारासाठी शासकिय रूग्णालय, नाशिक येथे नेले होते. तेथील डॉक्टारांनी तिच्या तपासण्या केल्यानंतर ती सात आठवड्याची गर्भवती असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गंगापुर पोलीस ठाण्याला माहिती दिली. 

गुन्ह्यातील आरोपी बाबत फिर्यादी व पिडीत मुलगी यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्या काहीएक माहिती देत नव्हत्या. त्या उडवा उडवीचे उत्तरे देवुन माहिती देण्यास टाळाटाळ करीत होत्या. गुन्ह्यात आरोपी पर्यंत पोहचण्या इतपत कुठलीही माहिती मिळुन येत नव्हती. गुन्हा अतिसंवेदनशील असल्याने तो उघडकीस आणणे गरजेचेच होते. फिर्यादी व पिडीतेकडे केलेल्या तपासात पिडीत मुलगी व फिर्यादी आई तसेच वडील हे काहीतरी माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोउनि मोतीलाल पाटील तसेच तपास अधिकारी महिला सपोनि पुनम पाटील, परि. पोउनि प्रियंका कवाद अशांच्या दोन तपास पथके तयार करण्यात आले. तपास अधिकारी म.सपोनि पुनम पाटील यांनी पिडीताचे व गर्भाचे डि.एन.ए सॅम्पल घेवुन रासायनिक तपासणी करीता पाठविले. 

गुन्हे शोध पथकाचे पोउनि मोतीलाल पाटील व टिमने 100 पेक्षा अधिक लोकांकडे माहिती गोळा करुन तपास सुरु केला. परंतु कुठलीही माहिती मिळुन येत नव्हती. फिर्यादी व पिडीत मुलगी ही वडीलांसोबत नाशिक येथे राहत असल्याने व पिडीताचे आई ही वारंवार मुळगावी जात असल्याने शेवटी संशयाची सुई पिडीताचे वडीलांवर आली. तपास अधिकारी पुनम पाटील यांनी पिडीताच्या वडीलांचेही डि.एन.ए सॅम्पल घेवुन रासायनिक तपासणी करीता पाठविले. 

डि.एन.ए सॅम्पलच्या तपासणीत पिडीतेच्या वडीलांनीच स्वताच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती राहीली. तसा अहवाल न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा यांचेकडुन प्राप्त झाल्याने पोलिसांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला.

त्यानंतर पोउनि मोतीलाल पाटील, पोहवा रविंद्र मोहीते, पोअं मुकेश गांगुर्डे, घनश्याम भोये, मच्छिंद्र वाकचौरे, राकेश राउत, विजय नवले अशांनी पिडीताच्या वडिलांचा शोध घेतला असता तो आठ दिवसांपासुन घरीच आला नसल्याची माहिती मिळाली. त्याचा मोबाइल फोन सुध्दा घरीच असल्याचे समजले. आरोपी नवीन मोबाईल फोन वापरत असल्याचे समजुन आल्याने पोउनि मोतीलाल पाटील व टिमने तांत्रिक विष्लेशनाच्या आधारे तपास करुन पिडीताचे वडील रा. बिहार सध्या रा. शिवाजीनगर, नाशिक यास सीबीएस, नाशिक भागातुन ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group