संतापजनक ! मुलीला शाळेत सोडतो म्हणाला अन कारमध्येच...
संतापजनक ! मुलीला शाळेत सोडतो म्हणाला अन कारमध्येच...
img
वैष्णवी सांगळे
विधवा आईच्या मित्राकडून तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. मुलीला शाळेत सोडतो असे सांगून कारमध्येच नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध डीपी रोड परिसरात ही घटना घडली आहे. लैंगिक अत्याचार केल्याचे कोणाला सांगितले तर बघून घेतो अशी धमकी त्याने मुलीला दिली. ज्ञानेश्‍वर रायरीकर असे अत्याचार करणार्‍या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात आईने तक्रार दाखल केली असून वारजे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली.

पीडित मुलीची आई विधवा आहे ती आणि ज्ञानेश्‍वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती. आईचा ज्ञानेश्‍वर वर विश्‍वास होता. त्यामुळे मुलीने शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्‍वरला बोलवले होते.  मात्र शाळेत न सोडताच त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजे ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती. त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईने अर्धा तास का उशीर झाला याची माहिती मुलीला विचारली आणि त्या मुलीने घाबरत उत्तर दिले. यावरून तिच्या आईचा संशय वाढला आणि आईने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच संबंधित वाहनाची तपासणी करून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. आरोपी ज्ञानेश्‍वर रायरीकर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group