नाशिक : आधी महिलेवर लैंगिक अत्याचार केले; लग्न करण्याची मागणी करताच मारून टाकण्याची दिली धमकी
नाशिक : आधी महिलेवर लैंगिक अत्याचार केले; लग्न करण्याची मागणी करताच मारून टाकण्याची दिली धमकी
img
वैष्णवी सांगळे
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी मच्छिंद्र शंकर आहेर (रा. मुरलीधर रेसिडेन्सी, वडजाई मातानगर, मखमलाबाद रोड, नाशिक) याने एप्रिल 2023 ते दि. 24 जुलै 2025 या कालावधीत वडजाई मातानगर, दत्तनगर, पेठ रोड येथे फिर्यादी महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केले. 

तक्रारदार महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपी आहेर याने पीडिता व तिच्या मुलाला मारहाण केली, तसेच “आपण दोघे वेगवेगळ्या जातींचे असल्याने आपले लग्न होऊ शकत नाही. माझा बायकोसोबतचा कोर्टातील मॅटर संपत आला असून, ती आता माझ्याकडे येऊन राहणार आहे. तुझा व माझा काहीच संबंध नाही. तू आमच्या संसारात ढवळाढवळ केलीस, तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली. 

तसेच फिर्यादीसोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला घरखर्चास पैसे देणे बंद केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मच्छिंद्र आहेर याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group