खळबळजनक ! ‘धुरंधर’ फेम अभिनेत्याला अटक, घरकाम करणाऱ्या महिलेचं १० वर्षे लैंगिक शोषण
खळबळजनक ! ‘धुरंधर’ फेम अभिनेत्याला अटक, घरकाम करणाऱ्या महिलेचं १० वर्षे लैंगिक शोषण
img
वैष्णवी सांगळे
मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून धुरंदर चित्रपटात भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. धुरंधर चित्रपटातील अभिनेता नदीम खान यास घरकाम करणाऱ्या महिलेशी जवळपास 10 वर्षे बलात्कार व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

मोलकरणीने गंभीर आरोप केल्यानंतर नदीम याला अटक करण्यात आली आहे. ‘धुरंधर’ सिनेमात नदीम याने रेहमान डकैत याचा कूक अखलाक याची भूमिका साकारली. मोलकरीण महिलेने केलेल्या आरोपांनुसार, लग्नाचं खोटं आश्वासन देऊन अभिनेत्याने मोलकरणीचं दहा वर्षे लैंगिक शोषण केलं.

माहितीनुसार, आरोप करणारी महिला ४१ वर्षांची आहे आणि नदीम खानच्या घरी काम करण्यापूर्वी तिने इतर अनेक कलाकारांसाठी काम केलं होतं. सध्या या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने म्हटले आहे की, 2015 मध्ये महिला अभिनेत्याच्या संपर्कात आली होती. पण वेळेनुसार, दोघांमधील संबंध घट्ट झाले आणि अभिनेत्याने महिलेला लग्न करण्याचं वचन दिलं. 

लग्नाचं वचन दिल्यानंतर, अभिनेत्याने अनेकदा महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता नदीम याने तब्बल १० वर्ष महिलेसोबत संबंध ठेवले. पण त्यानंतर अभिनेत्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पोलिसांना मुंबई येथील वर्सोवा पोलीस स्थानकात अभिनेत्याविरेधात गुन्हा दाखल केला. माहितीनुसार, ‘दोघांमध्ये शारीरिक संबंध सर्वप्रथम पीडित महिलेच्या घरात ठेवण्यात आले. महिलेचं घर मालवानी पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येतं. याच कारणामुळे वर्सोवा पोलिसांनी संबंधित प्रकरण मालवणी पोलिसांकडे वर्ग केले.’ आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group