किळसवाणे ! नवऱ्यानेच बनवला अ श्लील व्हिडिओ ! सासऱ्याचे कृत्य ऐकून तर हैराण व्हाल
किळसवाणे ! नवऱ्यानेच बनवला अ श्लील व्हिडिओ ! सासऱ्याचे कृत्य ऐकून तर हैराण व्हाल
img
दैनिक भ्रमर
उत्तर प्रदेशातून रोजच महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत असतात. त्यात आज पुन्हा एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आग्रा येथून हुंड्यासाठी छळ, लैंगिक शोषण आणि दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या 7 महिन्यांनंतर पीडितेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध आणि मुलीच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हा प्रकार आग्रा येथील कमला नगर परिसरातील आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न नोव्हेंबर 2024 मध्ये झाले होते. लग्नात सुमारे 1.50 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यामध्ये सोन्याचे दागिने, 40 लाख रुपये रोख, एक गाडी आणि फर्निचर यांचा समावेश होता. परंतु लग्नानंतर काही काळातच सासरच्या लोकांनी दोन कोटी रुपये अतिरिक्त हुंड्याची मागणी सुरू केली. मागणी पूर्ण न झाल्याने नवविवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला.

बेडरूममध्ये गुप्त कॅमेरा 

पीडितेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला काठीने बेदम मारहाण केली आणि तिच्यासोबत विचित्र कृत्यही केले. यापेक्षा वाईट म्हणजे, त्याने खोलीत गुप्त कॅमेरा लावला होता. ज्याद्वारे त्याने पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो सतत तिला ब्लॅकमेल करत होता. जेव्हा पीडितेने याबाबत तिच्या सासू आणि सासऱ्याला सांगितले, तेव्हा त्यांनीही तिला धमकावण्यास सुरुवात केली.

सासऱ्याने केला बलात्कार

पीडितेने सांगितले की, एके दिवशी तिचा पती तिला एका घरात घेऊन गेला जिथे आधीपासून एक तरुण उपस्थित होता. पतीने त्या तरुणाशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि त्या तरुणानेही तिला धमकावले. पीडित कशीबशी तिथून निसटून घरी पोहोचली, तेव्हा तिच्या सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने या घृणास्पद कृत्याची तक्रार आपल्या पतीकडे केली, तेव्हा त्याने कथितपणे तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी ती कशीबशी आपल्या माहेरी पोहोचली आणि कुटुंबाला आपली व्यथा सांगितली. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





इतर बातम्या
Join Whatsapp Group