उत्तर प्रदेशमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रयागराजमधील आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर पोलिसांनी रात्री छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना घरातील खोलीमध्ये काही तरुण- तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली.
प्राथमिक माहितीनुसार, प्रयागराजमधील किडगंज परिसरात ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी महिला आयएएस अधिकाऱ्याचे घर आहे. हे घर त्यांनी भाड्याने दिले होते. शेजारच्यांना या घरामध्ये रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. पोलिसांना याबाबत त्यांनी माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी ४ तरुणी आणि ४ तरुण पोलिसांना आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. पोलिसांनी या प्रकरणी ९ जणांना अटक केली. आयएएस अधिकाऱ्याचे घर १५००० रुपये महिना असे भाड्यावर दिले होते. कुटुंबासोबत राहण्याचा करार झाला होता. सुरूवातीला सर्वकाही सामान्य होते. पण नंतर रात्रीच्या वेळी या घरात तरुण-तरुणींचा वावर वाढू लागला.
रात्री उशिरापर्यंत याठिकाणी तरुण-तरुणी येत होते. यामुळे शेजारी राहणाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्याठिकाणी काही खोल्यांमध्ये तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. या सर्वांवर लक्ष ठेवणाऱ्या मास्टरमाइंडला पोलिसांनी घराबाहेरून अटक केली.