भीषण अपघात : कंटेनरने दुचाकीला चिरडलं, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
भीषण अपघात : कंटेनरने दुचाकीला चिरडलं, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
स्विमिंग पुलमध्ये आंघोळ केली, मजा-मस्ती केली. त्यानंतर घरी परतत असताना कंटेनरने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय. उत्तर प्रदेश  राज्यातील हापूर जिल्ह्यात हा धक्कादायक अपघात घडला. ज्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार , स्विमिंग पूलमधून परतत असताना, एकाच बाईकवर बसलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने  धडक दिली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार मुलांचा   समावेश आहे. हापूर जिल्ह्यातील हाफिजपूर पोलीस स्टेशन परिसरातील बुलंदशहर रोडवर हा अपघात घडला.

मोहल्ला मजिदपुरा येथील रहिवासी दानिश हा स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून त्याच्या कुटुंबातील चार मुलांसह एकाच बाईकवर घरी परतत होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही वेगवेगळ्या वाहनांवर होते. पण वाटेत महामार्गावर एका अनियंत्रित कंटेनरने त्याच्या बाईकला मागून धडक दिली.

मुलांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे समायरा (10 वर्षे), मायरा (11 वर्षे), समर (8 वर्षे), माहीम (9 वर्षे) आणि दानिश याचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताची  माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी जमले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. मृतांची बातमी ऐकताच रुग्णालयात मोठी गर्दी जमली.

हापूरचे पोलिस अधीक्षक विनीत भटनागर म्हणाले की, दानिश मुलांसह हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी कंटेनर जप्त केला आहे. चालकाचा शोध सुरू आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group