रस्ते अपघातातील जखमींना हॉस्पीटलमध्ये पोहोचवा आणि २५ हजार मिळवा
रस्ते अपघातातील जखमींना हॉस्पीटलमध्ये पोहोचवा आणि २५ हजार मिळवा
img
वैष्णवी सांगळे
केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघातग्रस्तांना अपघाताच्या गोल्डन अव्हरमध्ये हॉस्पिटल्स ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस राह-वीर म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा जाहीर केलेली आहे.एक व्यक्ती जास्तीत जास्त पाच वेळा या बक्षिसासाठी पात्र ठरू शकते. ही योजना नागरिकांना माणुसकीच्या भावनेतून जखमींना मदत करण्यासाठी प्रेरित करते. 

भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी लाखो अपघात होतात. ज्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतात . रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. याला गोल्डन अवर म्हणून ओळखले जाते.

रस्ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकार "राहवीर योजने" अंतर्गत ₹25000 चे बक्षीस देखील देते. तसंच, बहुतेक लोकांना या सरकारी योजनेची माहिती नाही.

राह वीर योजनेअंतर्गत, एखाद्या रस्त्यावरून जाणारा किंवा नागरिक अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवतो, तर त्यांना ₹25,000 रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र मिळते. मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019 च्या कलम 134A अंतर्गत लागू केलेली ही योजना मदत करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देखील प्रदान करते, म्हणजेच त्यांना पोलिस किंवा प्रशासनाकडून त्रास दिला जाणार नाही.

बक्षीस कोणाला मिळेल?
मदत करणारा हा पीडितेचा नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य नसावा. एकापेक्षा जास्त व्यक्ती मदत करत असतील तर रक्कम समान प्रमाणात विभागली जाईल. एका व्यक्तीला वर्षातून पाच वेळा बक्षीस मिळू शकते. ₹25,000ची रोख रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. मदतनीसाने जखमी व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवावी. मदतनीसाने प्रथम पोलिसांना किंवा हायवे हेल्पलाइनला अपघाताची माहिती द्यावी आणि पीडितेला ताबडतोब रुग्णालयात पोहोचवावे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group