बुलंदशहर : बुलंदशहरमध्ये एका अनियंत्रित कारने डिव्हायडरला धडक दिल्यानंतर आग लावली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये १ महिला गंभीर जखमी झाली आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,बदायूंमधील सहस्वान येथून लग्न समारंभाला उपस्थित राहून हे कुटुंब दिल्लीला परतत होतं. पहाटेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. अपघाताचं कारण आलं समोर चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला. कार एका डिव्हायडरला धडकली आणि खड्ड्यात पडली. कार खड्ड्यात पडताच तिला आग लागली. या कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
जहांगीराबाद पोलीस स्टेशन परिसरातील बुलंदशहर अनुपशहर रस्त्यावरील जानी गावाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला.
या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १ महिला गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताची सखोल चौकशी करत आहेत.
या दुर्दैवी अपघाताचे कारण कार चालकाला झोप लागल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या मते, दुचाकी वाचवण्याचा प्रयत्न करताना कार डिव्हायडरला धडकली, खड्ड्यात पडली आणि आग लागली. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.