अंबा घाटात भीषण अपघात , कामासाठी निघालेली बस १०० फूट खोल दरीत कोसळली
अंबा घाटात भीषण अपघात , कामासाठी निघालेली बस १०० फूट खोल दरीत कोसळली
img
वैष्णवी सांगळे
राज्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. दरम्यान आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर आणि रत्नागिरीला या शहरांना जोडणाऱ्या अंबा घाटात भीषण अपघात झालाय. मध्यप्रदेशचे पासिंग असलेली खासगी बस तब्बल 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली. 

मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. आज भल्यापहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आंबा घाटातील चक्री वळणाजवळ ही दुर्घटना घडली आहे. 

बसचालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. मात्र दरीत खाली जात असताना बस एका मोठ्या झाडावर आदळल्याने ती पूर्ण खोल दरीत जाण्यापासून वाचली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले. या बसमध्ये असलेले सर्व प्रवासी नेपाळवरुन आलेले होते. ते रत्नागिरीतल्या अंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group