दैनिक भ्रमर : राजस्थानमधील दौसा येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे खाटूश्याम मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला पिकअप ट्रकने जोरदार धडक दिली. या भयंकर अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली पिकअप खाटू श्यामचे दर्शन घेऊन घराकडे परत येत होती. त्यावेळी पिकअपचा अपघात झाला. या भयंकर अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही भाविकांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे, त्यांना उपचारासाठी जयपूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अपघातग्रस्त पिकअप खाटू श्याम मंदिराकडून येत होता. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती, की पिकअपचा जागेवरच चक्काचूर झाला. ७ चिमुकल्यांसह ११ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.