नांदगाव : पिनाकेश्वर घाटात पुन्हा अपघात : ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत कोसळली, २ ठार तर १३ भाविक जखमी
नांदगाव : पिनाकेश्वर घाटात पुन्हा अपघात : ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत कोसळली, २ ठार तर १३ भाविक जखमी
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर :  नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात पुन्हा एकदा अपघात घडला आहे. रविवारी (दि.१७) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दर्शन करून परतत असलेली भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने १३ भाविक जखमी झाले. चार दिवसांच्या आत घाटात घडलेली ही दुसरी घटना असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या अपघातात (कांताबाई नारायण गायके ( वय - ५६)रा. खामगाव ता. कन्नड) व (कमलबाई शामराव जगदाळे (वय - ६२)रा. जानेफळ ता. वैजापूर) या दोन महिला मयत झाल्या तर इतर भाविकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना मार लागला आहे. चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, आप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे आदी भाविक जखमी झाले.

हृदयद्रावक ! फर्निचर दुकानाला मध्यरात्री आग, झोपेतच संपूर्ण कुटुंबाचा अंत; नेमकं काय घडलं ? वाचा

जखमींना प्रथम बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी सर्वांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी भाविक व पर्यटकांनी धाडस करून दरीत उतरून जखमींना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनांतून आरोग्य केंद्रात पोहोचवले. स्थानिकांचा तत्पर सहभाग या दुर्घटनेत महत्त्वाचा ठरला.

Apple ने डोनाल्ड ट्रम्पना दिला मोठा झटका, घेतला 'हा' मोठा निर्णय

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस हवालदार भास्कर बस्ते, पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे, होमगार्ड ऋषिकेश पठाडे व गणेश इप्पर यांनी मदतकार्य केले.चार दिवसांपूर्वी याच घाटात झालेल्या अपघातातही भाविक जखमी झाले होते. सलग दोन दुर्घटनांमुळे पिनाकेश्वर घाटातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group