आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण घटना घडली आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारचा आणि दुचाकी मोठा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर कारच्या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. नितीन शेळके असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .