धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात महामार्ग पोलीस वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर-दहिवद फाटा हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेला एक महत्त्वाचा चौक आहे. या शिरपूर दहिवद फाट्यावर पोलीस वाहनाचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाचे मागचे टायर फुटले आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनातील एक पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे तर वाहनातील दोघे जखमी झाले आहेत.
नवल वसावे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पेट्रोलिंग करत असलेल्या वाहनामध्ये बसले होते. या वाहनातील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.