नाशिक : वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जण ठार
नाशिक : वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जण ठार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातांमध्ये हॉटेल कामगारासह एक वृद्ध ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे.

अपघाताचा पहिला प्रकार सारडा सर्कल परिसरात घडला. फिर्यादी प्रकाशराज धर्मदेव पडाल (रा. सारडा सर्कल, भद्रकाली) हा व त्याचा मित्र अक्षय निरंजन पाणी हे दोघे जण हॉटेल यात्रीमध्ये काम करतात. दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हे दोघे जण गडकरी सिग्नलकडून सारडा सर्कलकडे रस्त्याच्या कडेने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या कारच्या चालकाने अक्षय पाणी याला जोरदार धडक दिली. त्यात त्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला, तसेच अपघातानंतर कारचा चालक तेथून पळून गेला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

खळबळजनक ! सोनं चोरायचा अन बँकेत द्यायचा... पुढे करायचा असं काही की...

अपघाताचा दुसरा प्रकार अंबड येथे घडला. फिर्यादी गणेश सुरेश अनपट (रा. आदेश व्हिला, उत्तमनगर, सिडको) यांचे वडील सुरेश धोंडिबा अनपट (वय 75) व भाऊ उमेश अनपट (वय 46) असे एमएच 14 बीयू 8125 या क्रमांकाच्या होंडा अ‍ॅक्टिव्हाने त्यांच्या घरी येत होते. छत्रपती संभाजी स्टेडियमच्या मेनगेटजवळ आले असता एमएच 15 एके 1038 या क्रमांकाच्या बसवरील चालक दिलीप गंगाधर गांगुर्डे (वय 48, रा. नाशिकरोड) याने अनपट यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात फिर्यादीचे वडील सुरेश अनपट हे अंगावरून गाडी गेल्याने जागीच ठार झाले. त्यात फिर्यादीचे भाऊ उमेश हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group