सोशल मीडिया जितकं चांगलं, तितकंच वाईट. याच सोशल मीडियावरील डेटिंग ॲपची तरुणाईमध्ये भलतीच क्रेझ आहे. आणि याच डेटिंग ॲपच्या माध्यमातून अनेक जण स्वतःसाठी परमनंट किंवा टेम्पररी पार्टनरच्या शोधात असतात. आता हा पार्टनर नीट मिळाला तर ठीक नाहीतर आयुष्यात मोठा गदारोळ उडतो. आणि याच डेटिंग ॲपच्या माध्यमातून पीडित तरुणी आणि शिवम यांची ओळख झाली मात्र ही ओळख तरुणीसाठी घातक ठरलीय. शिवमने मुलीसोबत जे केलं ते ऐकून तुमच्याही अंगाला काटा येईल.
नेमकं प्रकरण काय ?
सप्टेंबर 2025 मध्ये डेटिंग ॲपवर शिवम आणि BSc बायोटेकचं शिक्षण घेणारी १९ वर्षीय तरुणीची ओळख झाली. त्यानंतर काही काळातच, त्यांचं नातं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये बदलल. चारित्र्याचा संशय घेत 16 फेब्रुवारी 2026 पासून तरुणीच्या छळ करण्यास तरुणाने सुरुवात झाली. सर्वात आधी तर, कथित आरोपीने स्टीलच्या बाटलीने तरुणीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर भिंत आणि कपाटाला तरुणीचं डोकं आपटलं. एवढंच नाही तर, तिच्या पायांवर चाकूने वार केले क्रुरतेच्या सर्व मर्यादा तेव्हा पार झाल्या जेव्हा त्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायजर शिंपडलं आणि आग लावली. शिवम याने पीडित तरुणीचे व्हिडीओ काढले आणि ‘आई होण्याची तुझी लायकी ठेवणार नाही’अशी तिला धमकी दिली.
पीडित तरुणीने 18 फेब्रुवारी रात्री तरुणाच्या फोनचा वापर करत आईला फोन केला आणि बंगाली भाषेत घडलेली घटना सांगितली. तरुणाला बंगाली भाषा कळत नव्हती त्यानंतर आईने तत्काळ 112 नंबरवर फोन केला आणि पोलिसांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि पीडित तरुणीला रेस्कू केलं. ही धक्कादायक घटना सायबर सिटी गुरुग्रामचा सेक्टर-69 येथे घडली आहे.
आईने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांना माहिती नव्हतं की, त्यांची मुलगी शिवम याच्यासोबत राहत आहे मुलगी ही पीजीमध्ये राहते,असंच सर्वांना वाटत होचं. गुरुग्राम पोलिसांनी कथित आरोपी शिवम याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.