पोलीस उपनिरीक्षकासाठी दोन लाखांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात
पोलीस उपनिरीक्षकासाठी दोन लाखांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- दोन लाख रुपयांची लाच घेताना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह दोन खाजगी इसमांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. 

दत्तात्रय एकनाथ गोडे राहणार कामटवाडी रोड अतुल भुजंगराव शिरसागर (रा. विश्रामगृह सिंहगड बिल्डिंग नाशिक) रमेश गंभीरराव अहिरे उपहारगृह चालक व कल्पेश रमेश अहिरे उपहारगृहचालक असे लाच घेणाऱ्या चौघांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जाच्या अनुषंगाने जामीन मिळण्यासाठी मदत करावी म्हणून तपासी अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे ज्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृहाचा उपहारगृहचालक कल्पेश रमेश अहिरे यांनी पंचांसमक्ष दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली.

दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मागणी केलेली लाचेची रक्कम नाशिक येथील शासकीय विश्रामगृहाच्या उपहारगृहाच्या पाठीमागील बाजूस खाजगी इसम रमेश अहिरे यांना घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ही लाचेची रक्कम अहिरे यांनी दत्तात्रय गोडे यांच्याकरिता स्वीकारली असून पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर व दत्तात्रय गोडे यांनी लाच स्वीकृतीस प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group