ACB ची मोठी कारवाई, शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदार जाळ्यात
ACB ची मोठी कारवाई, शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदार जाळ्यात
img
वैष्णवी सांगळे
बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला एसीबीने रंगेहाथ पकडलं. बीडच्या परळीतील तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही मोठी कारवाई केली. काही वेळापूर्वी त्यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. एसीबीच्या या कारवाईमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. 

परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदारास सॉल्वेंसी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. 

दरम्यान, एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अद्यापही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं भीषण वास्तव आहे. 
acb trap | Beed | ACB |
इतर बातम्या
Join Whatsapp Group