धक्कादायक ! कारमध्ये आढळला उपसरपंचाचा मृतदेह
धक्कादायक ! कारमध्ये आढळला उपसरपंचाचा मृतदेह
img
वैष्णवी सांगळे
बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत मोठी वाढ होत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या गुन्हेगारीचा विषय मोठा चर्चेत आला. यानंतर त्याठिकाणची अनेक प्रकरणे समोर आली. आता पुन्हा अनेकदा गेवराईमधील लुखामसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय वर्ष ३८) यांचा कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

गोविंद बरगे खासगी कामानिमित्त चारचाकी वाहनाने सोलापुरातील बार्शीमध्ये गेले होते. मात्र, मंगळवारी सकाळी सासुरे गावातील शिवारात कारमध्येच त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती तातडीने स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता गोविंद बरगे यांच्या डोक्याला गोळी लागली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची कार तपासली असता, त्यांच्या कारमध्ये पिस्तूल निदर्शनास आली. मात्र त्यांची हत्या की आत्महत्या हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group