सांगली शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. अवघ्या ३० रुपयांचा मावा देण्यावरून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ३० रुपयांचा पानटपरी वरील मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून शहरातील वडर गल्लीमध्ये वास्तव्य असलेल्या २८ वर्षीय नारायण सुरेश पवार या तरुणाला रविवारी चाकूने भोसकले होते. घटनेनंतर त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी तीन संशयित तरुणाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयितामध्ये त्याचे नातलग असल्याची माहिती मिळत आहे.